सीधे मुख्य सामग्री पर जाएं

प्रेम कवीता। मराठी काव्यधारा

शोधतेस आता तु त्याला
तो तर केव्हाच दूर गेला
तुझ्या जवळ असूनही
तुला न जाणवलेला
                   
                    तुझ्या मनात बसलेला
                 तुझ्या प्रेमात वेडा झालेला
                    तुझ्यावर प्रेम करणारा
                 आता तुझ्यापासून दूर गेला

काटेरी रस्त्यावरुन पावलं टाकत
तुझ्यापासून तो दूर गेला
तुझ्या प्रेमाच्या सावलीत बसलेला
तप्त ऊन्हात तळपत राहिला

                तुझ्या प्रेमात अमर होण्याची
                   स्वप्न पाहत असणारा
           तुझा चेहरा आठवतो का त्याला
                     कसा आठवणार ?

तु डोळ्यासमोर येताच
खाली मान घालून बसणारा
कधी तुझ्या प्रेमात पडणारा
तुझ्या प्रेमाची वाट पहाणारा

                बोलण्याची हिंमत न करणारा
                    मनातच तुला बोलणारा
                 तुझ्या मनावर प्रेम करणारा
           भटकला तुझे मन वाचता वाचता

आठ वर्षांची प्रेम कहाणी
रोज आठवते त्याला
मिटविण्यासाठी तुझ्या आठवणी
खोडरबड कमी पडत आहे त्याला

           मी होतो ड्रायव्हर माझ्या हृदयाचा
           पण हृदयाची मालकीण होतीस तु
           मला जरी माहीत असले सर्व रस्ते
           तरी तु दाखविलेल्या रस्त्याकडे
                 वळणारा होतो मी

तु गेलीस गाडीतुन माझ्या ऊतरुन
समोरुन येणाऱ्या टॅक्सीत बसून
मी एकटाच राहीलो माझ्या गाडीत
बसलो सर्व रस्ते विसरून
 
                   गाडी चालवली जोरात
              तुझ्यापासून दूर जाण्यासाठी
    होता तो रस्ता खोल दरीकडे नेण्यासाठी
                   रस्त्यात आले वळण
                  वळणासमोर होती दरी

हृदयरुपी गाडी माझी
पडली त्या खोल दरीत
झाले तुकडे तुकडे आता माझ्या गाडीचे
काही दिवसांनी बिलंही मिळेल
तुला तुझ्या टॅक्सीचे
                   -prakash shinde

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माझे नाव प्रकाश शिंदे. मी महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा देऊळगाव राजा तालुक्यात राहतो.                   मी इयत्ता ४ थी मध्ये असतांनाच मला एका सुंदर स्वप्न परीशी प्रेम झाले होते. त्या वेळी माझे वय ११ वर्ष होते. इतक्या लहान वयात चॉकलेट आणि बिस्किट शिवाय काहीही न कळणाऱ्या मनाला प्रेम मात्र चांगलेच कळु लागले होते. मला तिच्या चमकत्या डोळ्यात  पाहुन कळत नकळत प्रेमाची जाणीव होऊ लागली. त्या सुंदर मुलीचे सुंदर नाव श्रृती होते. तीच्या डोळ्यात नेहमी एक तेज दिसायचे. नेहमी हसरा चेहरा, सुंदर डोळे व त्यावरील काळ्याक्षार भुवया। तीच्याकडे बघीतल़्यावर माझ्या डोळ्याचे पापणही मिटत नव्हती. तीचा सुंदर चेहरा पाहिल्यावर जणुकाही कान बंद होतात व बाकी काहीच ऐकु येत नाही, नजर स्थिर होऊन पुर्ण शरीर स्तब्ध होते जणुकाही एखाद्याने जादू करून मला पुतळा बनवले आहे. वेळेचे भान हरपून जायचे, डोळ्यांचा फोकस फक्त तिच्या चेहर्‍यावर असायचा व बाकी सगळे अंधुक अंधुक दिसायचे, विचारशक्तीही क्षणभरासाठी बंद व्हायची, हृदयाचे ठोके वाढत होते, जणूकाही हृदयात कोणी आमच...