माझे नाव प्रकाश शिंदे. मी महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा देऊळगाव राजा तालुक्यात राहतो.
मी इयत्ता ४ थी मध्ये असतांनाच मला एका सुंदर स्वप्न परीशी प्रेम झाले होते. त्या वेळी माझे वय ११ वर्ष होते. इतक्या लहान वयात चॉकलेट आणि बिस्किट शिवाय काहीही न कळणाऱ्या मनाला प्रेम मात्र चांगलेच कळु लागले होते. मला तिच्या चमकत्या डोळ्यात पाहुन कळत नकळत प्रेमाची जाणीव होऊ लागली. त्या सुंदर मुलीचे सुंदर नाव श्रृती होते. तीच्या डोळ्यात नेहमी एक तेज दिसायचे. नेहमी हसरा चेहरा, सुंदर डोळे व त्यावरील काळ्याक्षार भुवया। तीच्याकडे बघीतल़्यावर माझ्या डोळ्याचे पापणही मिटत नव्हती. तीचा सुंदर चेहरा पाहिल्यावर जणुकाही कान बंद होतात व बाकी काहीच ऐकु येत नाही, नजर स्थिर होऊन पुर्ण शरीर स्तब्ध होते जणुकाही एखाद्याने जादू करून मला पुतळा बनवले आहे. वेळेचे भान हरपून जायचे, डोळ्यांचा फोकस फक्त तिच्या चेहर्यावर असायचा व बाकी सगळे अंधुक अंधुक दिसायचे, विचारशक्तीही क्षणभरासाठी बंद व्हायची, हृदयाचे ठोके वाढत होते, जणूकाही हृदयात कोणी आमची शाळा भरल्यावर वाजणारी घंटा वाजवत आहे.
त्या वयात मला प्रेम कसं झालं याच मला आजही आश्चर्य वाटते. पण म्हणतात ना की "प्यार की कोई ऊम्र नही होती" तसच काही माझ्याबाबतीत झाल होतं. रोज ती माझ्याकडे बघून हसायची मी तिच्याकडे बघून हसायचो, ती माझी नक्कल करायची मी तीची नक्कल करायचो, ती माझ्या पाठीमाघे शाळेतून घरापर्यंत यायची पण मी पहील्यापासूनच भित्रा तिच्या मागे जाण्याची माझी काही हिंमत व्हायची नाही. मी किरायाच्या खोलीमध्ये माझ्या छोट्याशा कुटुंबासोबत राहत होतो. ती घरापर्यंत आली की मी पायऱ्यांवरून पळत जाऊन घरात दप्तर फेकुन देत व घराच्या बालकणीत जाऊन तीला बाय करत. मला आठवते की एक दिवस माझ्या आईने मला बाय करतांना पाहीले होते. आईने विचारले की कोण आहे ती?। आणि मी हसत उत्तर दिले की "माझी मैत्रीण". त्या वेळेस मी इतका लहान होतो की माझ्या आईनेही खरं काय आहे हे ओळखले नसेल, कदाचित ओळखलेही असेल ह्याच निमताने माझी स्वप्नपरी माझ़्या आईने पाहीली होती.
शाळेत सर्वात अगोदर येणारे आम्हीच असायचो पण माझी तीला बोलण्याची हिंमत होत नव्हती. तिला बघण्यातच खुप आनंद मिळायचा. नेहमी तिचा विचार मनात असायचा. मला सर्वात जास्त तिचे चमकणारे डोळे आवडायचे, तिच्या डोळ्यात मला नेहमी चमकणा-या दोन चांदण्या दिसायच्या, डोळे असे होते जणूकाही विशाल सागराच्या पाण्यात काळोख रात्री आभाळातून चमकणारा चंद्र, तिच्या डोळ्यांच्या पाणथळ प्रवाहामध्ये मला नेहमी लुकलुकणारा पांढराशुभ्र तारा दिसायचा, पोर्णिमा असो अथवा अमावस्या तिच्या डोळ्यातील चंद्र मला नेहमी दिसायचा. तिच्या सुंदर रूपाने मला प्रेमात पडण्यास भाग पाडले. तिच्या सुंदर रुपानं व हसऱ्या चेहऱ्याने मला चुंबकासारखे अाकर्शित केले. आता मी तिच्या दुनियेत जगायला लागलो होतो. प्रत्येक क्षणाला तिचा हसरा चेहरा दिसु लागला होता. मनात नेहमी एका सुंदर भविष्याची कल्पना असायची. माझे मन पुर्णपणे तिच्या प्रेमात पडलं होतं, मी तिला अगदी मनापासून प्रेम करायचा लागलो होतो. प्रत्येक देवळात देवाकडे तिचं प्रेम मागायचो. तिला नेहमी आनंदीत पाहण्याची इच्छा मनात येत होती. बघता बघता मला तिच्यावर खूप प्रेम झालं होतं. ते माझं पहिलं प्रेम होतं. म्हणतात ना की पहिल प्रेम कधिही विसरू शकत नाही तसेच माझ्या बाबतीतही झाले आहे. मला नाही वाटत की मी तिला शेवटच्या क्षणापर्यंत विसरू शकेल. तिच्या आठवणी माझ्या हृदयाच्या चारही कप्यात कायमच्या साठवलेल्या आहे.

एकच नबर भावा
जवाब देंहटाएंएकच नबर भावा
जवाब देंहटाएं1 number
जवाब देंहटाएं1 number
जवाब देंहटाएं