माझे नाव प्रकाश शिंदे. मी महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा देऊळगाव राजा तालुक्यात राहतो. मी इयत्ता ४ थी मध्ये असतांनाच मला एका सुंदर स्वप्न परीशी प्रेम झाले होते. त्या वेळी माझे वय ११ वर्ष होते. इतक्या लहान वयात चॉकलेट आणि बिस्किट शिवाय काहीही न कळणाऱ्या मनाला प्रेम मात्र चांगलेच कळु लागले होते. मला तिच्या चमकत्या डोळ्यात पाहुन कळत नकळत प्रेमाची जाणीव होऊ लागली. त्या सुंदर मुलीचे सुंदर नाव श्रृती होते. तीच्या डोळ्यात नेहमी एक तेज दिसायचे. नेहमी हसरा चेहरा, सुंदर डोळे व त्यावरील काळ्याक्षार भुवया। तीच्याकडे बघीतल़्यावर माझ्या डोळ्याचे पापणही मिटत नव्हती. तीचा सुंदर चेहरा पाहिल्यावर जणुकाही कान बंद होतात व बाकी काहीच ऐकु येत नाही, नजर स्थिर होऊन पुर्ण शरीर स्तब्ध होते जणुकाही एखाद्याने जादू करून मला पुतळा बनवले आहे. वेळेचे भान हरपून जायचे, डोळ्यांचा फोकस फक्त तिच्या चेहर्यावर असायचा व बाकी सगळे अंधुक अंधुक दिसायचे, विचारशक्तीही क्षणभरासाठी बंद व्हायची, हृदयाचे ठोके वाढत होते, जणूकाही हृदयात कोणी आमच...